Issue 153

posted in: 2025, Sandarbh Issues | 0

Apr. – May 25

संदर्भ परिवाराकडून डॉ. जयंत नारळीकर यांना विनम्र आदरांजली

महान शास्त्रज्ञ रॅंगलर डॉ. जयंत नारळीकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विज्ञानाच्या कार्यात व्यतीत केलं. त्यांचं हे कार्य सर्वश्रुत आहेच पण विज्ञान प्रचार प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं. यामागे वैज्ञानिक अभिवृत्ती वाढावी हाच हेतू होता.

१९९९ साली जेव्हा शैक्षणिक संदर्भ प्रकाशित करण्याची इच्छा आम्ही प्रदर्शित केली, तेव्हा आमच्या या प्रयत्नांना त्यांच्याकडून पत्ररूपाने शुभेच्छा मिळाल्या. ते पत्र आज आपल्याला वाचण्यासाठी देत आहोत. या खेरीज संदर्भमध्ये पूर्वी प्रकाशित झालेले त्यांचे लेख वाचण्यासाठी संदर्भच्या अंकांचे दुवे पाठवत आहोत. अवश्य वाचा.

“सत्य : कल्पनेच्या पावलांवरून”
“पुराणातील वांगी विज्ञान विकासाची”

१. शीतनिद्रा (PDF)

लेखक – अर्पिता व्यास

(कळीचे शब्द :- शीतनिद्रा, सुप्तावस्था, शरीराचे तापमान नियंत्रण, संवाहन, अभिसरण, विकिरण, बाष्पीभवन)

२. ऊन किती तापलंय – बसू दे थोडा चटका !

दर वर्षी मार्च महिन्यापासून तापमान वाढू लागतं. उन्हाच्या झळा बसू लागतात आणि आपण टोपी, स्कार्फ बाहेर काढतो. पण या उन्हाचं आपल्या शरीराच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, हे सांगणारा शैक्षणिक संदर्भच्या अंक ९८ मधला लेख वाचण्याकरीता सुचवत आहोत.

३. अंत अन आरंभही… (PDF)

लेखक : कौस्तुभ मुदगल

(कळीचे शब्द – गणित, शून्य, शुन्याचा शोध,भारतीय गणिती ब्रह्मगुप्त, गियोम द’ओपिताल, ओपिताल  रूल)

४. आपली पिढी : शेवटची …का पहिली?

हॅना रिची या ऑक्सफर्ड विद्यापीठात विदा वैज्ञानिक आणि संशोधक आहेत. ‘Our World in Data’ या वेबसाईटच्या त्या एक संपादक आहेत. वातावरण बदल आटोक्यात ठेवण्यासाठी जी चळवळ जगभर चालू आहे, त्यातील हे अत्यंत मान्यताप्राप्त नाव आहे. मानवी व्यवहारांमुळे ओढवलेली भयंकर परिस्थिती समजावून घेत असताना त्यांची वेगळी मांडणी महत्त्वाची आहे.

‘Are we the last generation…’ या नावाचा त्यांचा ‘टेड टॉक’ ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

(कळीचे शब्द – शाश्वत जीवनशैली, वातावरण, वातावरण बदल, पर्यावरण,)

त्यातील काही भागाचा अनुवाद वाचण्यासाठी इथे क्लिक करा.