Aug. – Sept. 26

ऑगस्ट – सप्टेंबर २०२६ |अंक १६१

चित्र इंटरनेट वरुन साभार : Baidu Wiki Entry for the Three-North Shelterbelt Forest Program.
१. वातावरण बदलाचं जागतिक राजकारण – इतिहास
जागतिक तापमानवाढ आणि भवतीचे राजकारण – भाग २
लेखक : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे
जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदलामागील वैज्ञानिक आणि आर्थिक मुद्द्यांच्या तसंच राजकीय आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीतील मुद्दयांच्या अनुषंगाने नाशिकच्या डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेमध्ये २० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या व्याख्यानाचा हा दूसरा भाग. तेव्हापासून मागील पाच-सहा महिन्यांतील घडामोडींची जोड देऊन ही लेखमाला लिहिली आहे.
(कळीचे शब्द : जागतिक तापमान वाढ, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आय पी सी सी), कॉमन बट डिफरेन्शिएटेड रेस्पॉन्सिबिलिटी (सी बी डी आर), नॅशनली डिटरमाईंड काँट्रीब्युशन (एन डी सी), कार्बनचा व्यापार, अनुकूल निधी)
२. जगातला पहिला ई-स्पोर्ट : बुद्धिबळ
लेखक : टिबी पुयू
इंटरनेटच्या आधी, व्हिक्टोरियन काळात बुद्धिबळ खेळण्यासाठी इलेक्ट्रिक टेलिग्राफचा वापर होत असे,यामुळे बुद्धिबळाबरोबरच टेलिग्राफ हे तंत्र आणि यंत्रही कसं बहराला आलं याचा रंजक इतिहास वाचा, ‘जगातला पहिला ई स्पोर्ट :बुद्धिबळ’ या टिबी पुयू यांच्या लेखात.
(कळीचे शब्द : बुद्धिबळ, तारायंत्र, सॅम्युअल मोर्स, दूरस्थ खेळ)
३. चीनची ग्रेट ग्रीन वॉल – वृक्ष लागवडीचा धडा
लेखक : राजीव पंडीत
चीनने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ७८ अब्ज झाडे लावून जगातील सर्वात मोठी वृक्षारोपण मोहीम राबवली. यामुळे जमिनीची धूप थांबवण्यात यश आलं पण पाण्याच्या उपलबद्धतेचं गणित मात्र पूर्ण बिघडलंय. नेमकं काय घडलं याबद्दल वाचू या, ‘चीनची ग्रेट ग्रीन वॉल : वृक्ष लागवडीचा धडा’ या राजीव पंडीत यांच्या लेखात.
(कळीचे शब्द : चीनची ग्रेट ग्रीन वॉल, वृक्ष लागवड, पर्यावरण, ग्रीन पॅराडॉक्स)
४. गोष्टी ईश्वराच्या भाग – २
लेखक : विष्णू नागर
अनुवाद : संजीवनी आफळे
एखाद्या माणसाला खरंच ईश्वर भेटला आणि त्याने त्या माणसाला मदत करायची ठरवली तर छानच की ! पण त्या माणसाने ईश्वराला ओळखलं नाही तर? वाचा विष्णु नागर यांच्या ‘ गोष्टी ईश्वराच्या’ या संजीवनी आफळे यांनी अनुवादित केलेल्या कथेत.
(कळीचे शब्द : कथा)
५. डॉ. असिमा चॅटर्जी १९१७ – २००६
लेखक : सायली मुठेकर
प्राकृतिक रसायनशास्त्र, औषध निर्मिती आणि शिक्षण क्षेत्रात अनमोल संशोधन करणाऱ्या डॉ. असिमा चॅटर्जी यांचा 23 सप्टेंबर 2017 हा जन्मदिन. त्यांनी केलेलं संशोधन आजही जागतिक स्तरावर आदराने उल्लेखले जाते. आधुनिक विज्ञान आणि परंपरागत ज्ञान यांच्यातली दरी कमी करणाऱ्या विदुषी डॉ. असिमा चॅटर्जी यांच्या कार्याचा आढावा घेणारा सायली मुठेकर यांचा लेख अवश्य वाचा.
(कळीचे शब्द : भारतीय वैज्ञानिक, औषध निर्मिती, ऑयर्वेद, अपस्मार, अपस्मार विरोधी औषध, आयुष्य – ५६)
अंकातील इतर सर्व चित्रे इंटरनेटवरून साभार.