Feb. – Mar. 26

फेब्रुवारी – मार्च २०२६ |अंक १५८

१. डॉ. शांतिस्वरूप भटनागर : द अप्लाइड सायंटिस्ट
लेखक : डॉ. नितीन हांडे
भारतातील संशोधन प्रयोगशाळांचे जनक म्हणून ओळखले जाणारे शांतिस्वरूप भटनागर हे रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रशासक होते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) पहिले महासंचालक आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) पहिले अध्यक्ष देखील होते. त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा डॉ. नितीन हांडे यांचा लेख अवश्य वाचा- डॉ. शांतिस्वरूप भटनागर : द अप्लाइड सायंटिस्ट.
(कळीचे शब्द : शांतिस्वरूप भटनागर, पृष्ठीय तणाव, कोहेजन, ॲड्हेजन, इमल्शन)
२. हे वाचलेत का?
“मिथकों से विज्ञान तक – बह्माण्ड के विकास की बदलती कहानी”
पुस्तक परिचय
विज्ञान कशाला म्हणायचं?’ या प्रश्नाचा आढावा घेताना प्राचीन कथांपासून ते विज्ञानाची परिभाषा, तंत्रज्ञान, वैज्ञानिक पद्धती, वैज्ञानिक दृष्टी, अवैज्ञानिक दावे या सगळ्याचा परामर्श असलेलं, सामान्य माणसाचं विज्ञानाशी नातं कसं असतं हे सांगणारं, विज्ञानातले तर्क आणि सत्य यातला फरक स्पष्ट करणारं एक पुस्तक ‘मिथकों से विज्ञान तक- ब्रह्मांड के विकास की बदलती कहानी’ हे पुस्तक गौहर रजा यांनी लिहिलं आहे. त्याचा परिचय आणि एका भागाचा अनुवाद अवश्य वाचा.
(कळीचे शब्द : विश्वाची उत्पत्ती, प्रसरण पावणारे विश्व, ब्रह्माण्ड, वैज्ञानिक आणि गैर वैज्ञानिक)
३. कावळा आणि कोकिळा – संघर्ष की सहकार्य?
लेखक : कालू राम शर्मा
कावळा आणि कोकीळ यांचा प्रजनन काल साधारण एकच असतो. कोकिळा तिची अंडी कावळ्याच्या घरट्यात घालते. जैवविकासाच्या टप्प्यातली ही आश्चर्याची गोष्ट आहे. कावळासुद्धा कोकिळेची अंडी स्वतःचीच समजून उबवतो आणि तिच्या पिलांचे संगोपनही करतो. यात दोघांचाही फायदा कसा आहे , ते कालू राम शर्मा यांच्या ‘ कावळा आणि कोकिळा : संघर्ष की सहकार्य? या लेखात वाचू या.
(कळीचे शब्द : कावळ्याचे घरटे, कोकिळेची अंडी, पक्ष्यांचे सहजीवन, परजीवी-यजमान संबंध)
४. भाजीचा दर
लेखक – आमोद कारखानीस
“शाळेबाबत आठवणी सांगताना पु. ल. देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, ‘शाळेत इतकी वर्ष गणित शिकून काय उपयोग झाला? आमची भाजीवाली सुद्धा दीड पाव भेंडी, अर्धा किलो टोमॅटो; यांचे पैसे किती झाले याचा हिशोब माझ्या कितीतरी आधी करते.’ बरोबर आहे, आपले शालेय गणित सूत्रांमध्येच अडकून आहे. यासारख्या व्यवहारातल्या गणिताकडे ते बघतच नाही.”
व्यवहारातील गणित, विज्ञान याविषयीचे विश्लेषण या लेखात वाचा.
(कळीचे शब्द : गणित सूत्रे, भाजीचा दर, वेग, गती, घनत्व, वस्तुमान, रेषीय प्रसरणांक)
अंक १५८ कव्हर चित्रे संदर्भ :
https://www.thenakedscientists.com/articles/science-news/cuckoo-chicks-earn-their-keep
अंकातील इतर सर्व चित्रे इंटरनेटवरून साभार.