Issue 156

posted in: 2025, Sandarbh Issues | 0

Oct. – Nov. 25

आयव्हीएफ (In vitro Fertilization) म्हणजेच ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाने जन्माला आलेली पहिली मुलगी लुईस ब्राउन. हे तंत्रज्ञान आणि तीन व्यक्तींचे डीएनए वापरून ‘मायटोकॉंड्रियल डिसीज’ या आनुवांशिक आजारापासून मुक्त असलेली आठ मुलं इंग्लंडमध्ये जन्माला आली आहेत. त्याबद्दल वाचा ‘डिझायनर बेबीज??’ या लेखामध्ये.

१. ‘पर्यावरणाचा मनुष्यकेंद्री विचार’

द्वारा – डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

समाजवादी महिला सभेने आयोजित केलेल्या सत्रामध्ये ‘पर्यावरणाचा मनुष्यकेंद्री विचार’ या विषयावरील डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांचे विचार ऐका, 

२. ‘व्हाईट नॉईज’ (PDF)

कथा

लेखक – डॉन दलीलॉ 

ही कथा अमेरिकन कादंबरीकार, लघुकथा लेखक, नाटककार, पटकथाकार आणि निबंधलेखक डॉन दलीलॉ यांच्या ‘व्हाईट नॉईज’ या कादंबरीतील सहाव्या प्रकरणातील एक भाग आहे, हाईनरिख आणि त्याच्या वडिलांमधील वादविवाद.

(कळीचे शब्द : कथा, डॉन दलीलॉ)

३. प्रा. नरेश दधीचसरांना विनम्र आदरांजली

प्रा. नरेश दधीच यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील आयुका संस्थेच्या उभारणीसह अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात त्यांनी आपला ठसा उमटवला. संदर्भ द्वैमासिक मराठीत सुरू करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली होती.

2003 मध्ये प्रयास संस्थेने शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान जाणून घेण्यासाठी संशोधन संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव देणारा एक प्रकल्प केला होता. त्याच्या अहवाल प्रकाशन समारंभात दधीचसरांनी आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना समजेल अशा रीतीने सापेक्षता सिद्धांत समजावून दिला होता. संदर्भाच्या अंक 25 मध्ये पान 56 ते 60 वर हे भाषण वाचता येईल. त्यासाठी अंक 25 ची लिंक देत आहोत. दधीचसरांना विनम्र आदरांजली. 

४. ‘डिझायनर बेबीज ??’ (PDF)

लेखक – संजीवनी आफळे

पेशीतील ऊर्जेचे केंद्र असणाऱ्या मायटोकॉंड्रियामध्ये जर बिघाड असेल, तर अनेक प्रकारचे मायटोकॉन्ड्रियल विकार होऊ शकतात. स्नायूंच्या आणि मज्जापेशींच्या समस्या ही या विकारांची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे मुलामध्ये गंभीर स्वरूपाचं शारीरिक अपंगत्व येतं, तर काही मुलांचा जन्मानंतर काही दिवसांतच मृत्यू होतो. आयव्हीएफ हे उपयुक्त तंत्रज्ञान या आनुवंशिक आजारावर मात करण्यासाठी इंग्लंडमधील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या वापरले आहे. ते खरंच उपयुक्त आहे की त्यातून आणखी काही सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात या बद्दल वाचू या, ‘डिझायनर बेबीज ??’ या संजीवनी आफळे यांच्या लेखात.

(कळीचे शब्द : आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी, वंध्यत्व, मायटोकाँड्रिया विकार, जनुकीय द्रव्य)

५. ‘विज्ञान शिक्षणाच्या वाटेवर भेटलेला फकीर: अरविंद गुप्ता’ (PDF)

लेखक – नीलिमा सहस्रबुद्धे

आपली शिक्षणपद्धती शाळेतल्या मुलांना ‘का?’ असा प्रश्न विचारायला शिकवत नाही. एखाद्या प्रयोगामागचं विज्ञान कसं समजून घ्यायचं, एखादी गोष्ट कशी शोधून काढायची असते, सांगितलेल्या गोष्टी निरीक्षण करून कशा तपासून बघायच्या असतात, हे मुलांना माहीत नसतं. अशा परिस्थितीत जरा सुद्धा न डगमगता, न घाबरता अरविंद गुप्ता खेळण्यांच्या माध्यमातून मुलांना विज्ञान शिकवायचा सतत प्रयत्न करत राहिले. २०११ सालच्या पालकनीती दिवाळी अंकात प्रकाशित झालेली, नीलिमा सहस्रबुद्धे यांनी घेतलेली अरविंद गुप्तांची मुलाखत वाचा.