Issue 155

posted in: 2025, Sandarbh Issues | 0

Aug. – Sept. 25

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कारकिर्दीत निर्माण केलेले खडकवासला धरणाचे स्वयंचलित दरवाजे.

१. ‘जेव्हा पल्लवीआत्या सुलताना झाली’ (PDF)

लेखक – हरजिंदर सिंह ‘लाल्टू’

मुलांनाच काय पण मोठ्यांनाही कल्पनाविश्वात रमायला आवडतं. एकदा पल्लवीआत्या अशीच सुलताना झाली,पण कशी, मग काय झालं,ती कुठे गेली होती, मग परत कशी आली ? हे वाचा ‘जेव्हा पल्लवीआत्या सुलताना झाली’ या हरजिंदर सिंह ‘लाल्टू’ यांच्या कथेत. अनुवाद केला आहे संजीवनी आफळे यांनी.  

(कळीचे शब्द : कथा, विज्ञान कथा, अंतराळ)

२. विज्ञान शिक्षणासाठी कार्यशाळा – उष्णता (PDF)

लेखक – प्रकाश बुरटे

काडेपेट्या आणि मेणबत्त्या यांच्या साहाय्याने आणि चहा कसा करावा याची चर्चा करून प्रकाश बुरटे यांनी त्यांच्या विज्ञान कार्यशाळेमध्ये मुलांना विज्ञान शिकवले आहे.

‘पालकनीती’ मासिकात जुलै २००० मध्ये प्रकाशित झालेला  ‘विज्ञान शिक्षणासाठी कार्यशाळा – उष्णता’ हा लेख अजूनही शिक्षक आणि विज्ञानप्रेमींना उपयुक्त ठरेल असा आहे.

३. ‘एका इतिहासकाराचे मनोगत’ (PDF)

लेखक – श्रद्धा कुंभोजकर

गतकाळाचा अवाजवी पूर्वगौरव न करता आणि त्याबाबत वृथा न्यूनगंडदेखील न बाळगता तथ्यांवर आधारलेलं असं एक वास्तवाच्या जवळ जाणारं आकलन इतिहासकार तयार करू शकतात. इतिहास कसा सलिहीला जातो, त्यात कोणकोणते काम आधारभूत असते, कोणत्या अडचणी येतात अशा काही मुद्द्यांवर श्रद्धा कुंभोजकर यांनी “एका इतिहासकाराचे मनोगत” या आपल्या भाषणात मांडणी केली आहे. त्यातला निवडक भाग इथे देत आहोत.

(कळीचे शब्द : इतिहास, इतिहासकार, इतिहासाचे पुरावे)

४. ‘भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’ – सर विश्वेश्वरय्या यांचा जीवनपट (PDF)

लेखक – डॉ. नितीन हांडे

१५ सप्टेंबर हा भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने डॉ. नितीन हांडे यांनी लिहिलेला ‘भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’ हा सर विश्वेश्वरय्या यांचा जीवनपट

(कळीचे शब्द : मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, राष्ट्रीय अभियंता दिवस, भारतरत्न, कैसर ए हिंद, सर विश्वेश्वरैया सायन्स म्युझियम)