प्रिय वाचक,
शैक्षणिक संदर्भच्या वाटचालीतील एक महत्त्वाचे स्थित्यंतर आपल्याला सांगायचे आहे. म्हणून हे विशेष पत्र.

शैक्षणिक संदर्भ द्वैमासिकाचे आपण नियमित वाचक आहात.

१९९९ ऑगस्टपासून दर दोन महिन्यांनी आम्ही अंक प्रकाशित करत आलो.

मराठीतून चांगले विज्ञान वाचायला मिळावे, मुलांच्या कुतूहलाला प्रोत्साहन मिळावे, अनुभवांना जोडून असलेल्या विज्ञानाची सहज ओळख व्हावी आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा असे उद्देश यामागे होते.

आमची मूळ प्रेरणा होती – त्यावेळी एकलव्य होशंगाबाद प्रकाशित करत असलेले शैक्षिक संदर्भ. एकलव्यने मोठ्या आनंदाने मराठीत द्वैमासिक काढायला, अनुवाद करून छापायला परवानगी आणि प्रोत्साहनही दिले. शिवाय मराठी विज्ञान-लेखकांनी वेळोवेळी साहाय्य केले, अनुवादकांनी तत्पर आधार दिला, कोणत्याही मोबदल्याशिवाय. त्यामुळे हा ना-नफा प्रयत्न आत्तापर्यंत सुरळित चालू राहिला.

मात्र सर्व मराठी नियतकालिकांच्या प्रमाणेच वर्गणीदार वाचक कमी होण्याचा फटका, विविध कारणांमुळे जाणवत राहिला. हा प्रयत्न ना-तोटा सदरात चालवणेदेखील गरजेचेच आहे.

आजच्या वाचनाची चालू पद्धत पाहिली, तर छापील साहित्यापेक्षा इ-साहित्य गरजेचे ठरते आहे. त्यामुळे, २०१८ सालामध्ये शैक्षणिक संदर्भची छापील आवृत्ती न काढता इ-अंक प्रकाशित करण्याची सुरुवात करत आहोत.

त्यासाठी आपणास विनंती आहे की
आपला इ-मेल पत्ता आम्हाला sandarbh.marathi@gmail.com वर पाठवावा,
आपला whats-app फोन नं. कळवावा,
आपला सहभाग वार्षिक देणगी रूपात संदर्भ सोसायटीकडे पाठवावा.
आपले,
संपादक,
शैक्षणिक संदर्भ
Sandarbh society, a/c no. 20047006634, MAHB0000852.
Maharashtra Bank,Mayur colony, Pune, 411029

मागील वर्षाचे अंक १०३ ते १०८ : रु. ३००/- मध्ये उपलब्ध आहेत.
अंक १०२ आधीच्या निवडक ५० अंकांचा संच सवलतीच्या दरात रू. १२५०/- मध्ये मिळू शकेल. (कुरीयरचा खर्च, साधारण रू.२००/- वेगळा.)